सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 11 एप्रिल 2018 (10:31 IST)

शिवसेना सवतीप्रमाणे वागते म्हणून .......

शिवसेना सवतीप्रमाणे वागते म्हणून नारायण राणेंना सोबत घ्यावं लागलं असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मारला आहे. एका कार्यक्रमात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेसमधून आलेल्या नारायण राणेंना तुम्ही पक्षात घेतलं. त्यांनी शिवसेनेसोबत युती झाली तर बाहेर पडणार असा इशारा दिला आहे असं विचारलं असता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, आम्हाला त्यांना का घ्यावं लागलं याचं आत्मचिंतन तुम्ही करावं. तुम्ही सवतीप्रमाणे वागता म्हणून आम्हाला राणेंना सोबत घ्यावं लागलं.

काही दिवसांपुर्वी नारायण राणे यांनी २०१९ च्या निवडणुकीत भाजपाने शिवसेनेसोबत युती केल्यास आपण बाहेर पडू असं स्पष्ट सांगितलं होतं. मला पक्षात घेतलं तर सत्तेतून बाहेर पडू असं जर ते म्हणत असतील तर मग मीदेखील त्यांची युती झाल्यास बाहेर पडेन असं नारायण राणे बोलले होते.