शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 7 एप्रिल 2018 (15:46 IST)

मनोरुग्णाच्या हल्ल्यात दोन ठार, तर जमावाच्या हल्ल्यात मनोरुग्ण ठार

नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा येथे विचित्र प्रकार घडला आहे. एका मनोरुग्णाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर त्यामुळे चिडलेल्या जमावाने केलेल्या हल्ल्यात गंभीररित्या जखमी मनोरुग्णाच्या रुग्णालयात मृत्यू झाला आहे. घटना नाशिकमधील सुरगाणा तालुक्यात वांजुळपाडा भागात घडली आहे.

माथेफिरुचे नाव भास्कर जोपले असे होते. या माथेफिरू मनोरुग्णाने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात राही बागुल 45 वर्षीय महिलेचा आणि गुलाब पालवी या 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. माथेफिरू भास्कर जोपले या मनोरुग्णाने कुऱ्हाड आणि दगडाने केलेल्या मारहाणीत दोघांना आपले प्राण गमवावे लागले होते. मात्र जेव्ह्या ही घटना गावातील लोकांना कळली तेव्हा संतप्त जमावाने या माथेफिरूवर जबरदस्त हल्ला केला आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. मात्र गंभीर जखमी केलेल्या माथेफिरुचा वणी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे सुरगाणा तालुक्यात वांजुळपाडा भागात पोलिसांच्या समक्ष महिलेवर त्याने हल्ला केला होता. पोलिस चौकशी करत असून गुन्हा नोंदवला आहे.