मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 10 एप्रिल 2018 (15:42 IST)

भयंकर : पित्याकडून अल्पवयीन मुलींवर बलात्कार

मुंबईमध्ये अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्या ४२ वर्षांच्या नराधम पित्याला पोलिसांनीअटक केली आहे. नराधम हा फॅशन डिझायनर असून त्याने १७ आणि १३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. 
 
मुंबईत राहणाऱ्या फॅशन डिझायनरला चार मुलं आहेत. त्याला १७, १३ आणि १० वर्षांची अशा तीन मुली आहे. तर त्याचा लहान मुलगा तीन वर्षांचा आहे. नराधम पित्याने त्याच्या १७ आणि १३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. १७ वर्षांच्या मुलीने दिलेल्या जबाबानुसार, दोन वर्षांपूर्वी तिच्या आईला बरे नसल्याने ती तिच्या खोलीत झोपली होती. याच दरम्यान नराधम पित्याने मोठ्या मुलीवर बलात्कार केला. या प्रकाराची वाच्यता केल्यास शिक्षणासाठी पैसे देणार नाही आणि घरीच बसावे लागेल, अशी धमकी तो द्यायचा. यानंतरही नराधमाने पीडितेवर अत्याचार सुरुच ठेवले.
 
गेल्या वर्षी नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये मोठी मुलगी आणि दुसरी मुलगी या दोघी खोलीत टीव्ही बघत होत्या. यादरम्यान विकृत पित्याने त्यांच्या खोलीत प्रवेश केला आणि दुसऱ्या मुलीसोबत अश्लील चाळे केले. मोठ्या मुलीने त्याला रोखण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र, यानंतर त्याने मोठ्या मुलीवरही बलात्कार केला. दोन दिवसांपूर्वी पित्याचे अत्याचार असह्य झाल्याने अखेर मोठ्या मुलीने धाडस दाखवत आईला वडिलांनी केलेल्या अत्याचारी माहिती दिली. तिने पतीला जाब विचारला. मात्र, त्याने पत्नीलाच मारहाण केली. अखेर महिलेने पोलिसांकडे धाव घेत पतीविरोधात तक्रार दाखल केली.