मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 4 एप्रिल 2018 (15:52 IST)

बांधकामासाठी आणलेल्या वाळूतून आला मृतदेह बाहेर

धक्का दायक प्रकार औरंगाबाद येथे घडला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या इमारत बांधकामासाठी आनलेल्या वाळूच्या ट्रकमध्ये वाळू उपसा करतांना मृतदेह बाहेर आला आहे.या घटनेमुळे शहरात जबरदस्त खळबळ उडाली आहे. पोलीसांनी घटनास्थाळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे. या हत्येमागे घातपाताचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.  हडको भागात हा प्रकार समोर आला आहे. हडको परिसरात एन-११ नवजीवन कॉलनी परिसरात एका मोकळ्या जागेत बांधकामासाठी वाळूची साठवण करून ठेवण्यात आली आहे. बुधवारी या वाळूमध्ये मृतदेहाची ओळख पटली असून, समाधान किसन म्हस्के (३५ वर्षे. रा.नवनाथनगर) याचा मृतदेह आहे. या घटनेची माहिती तात्काळ सिडको पोलीसांना देण्यात आली. माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, पोलीस निरीक्षक कैलास प्रजापती यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती. समाधान यांच्या अंगावर मारहाण खुणा दिसत असून पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार हाघातपात असावा असे सागितले आहे.