सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 29 जानेवारी 2018 (11:45 IST)

संदीप लामिचेन आयपीएल खेळणारा पहिला नेपाळी

संदीप लामिचेनने आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात आपल्या   नावाची नोंद केली आहे. संदीप हा आयपीएलमध्ये सहभागी होणारा पहिला नेपाळी क्रिकेटपटू ठरला आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने च्यासाठी 20 लाख रुपयांची बोली लावली. 17 वर्षांच्या संदीपने 9 सामने खेळले असून तो लेगब्रेक, गुगली गोलंदाज आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार माकेल क्लार्क याच कुशीतच संदीप तयार झाला आहे. संदीपकडून क्लार्कला अव्वल कामगिरीची अपेक्षा आहे. या वर्षाच्या सुरुवातीला क्लार्कने त्याला हाँगकाँगमध्ये मार्गदर्शन केले.