शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 जानेवारी 2018 (09:06 IST)

विराट कोहली आयसीसीचा सर्वोत्कृष्ट खेळाडू

विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने(आयसीसी) २०१७ या वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला आहे. त्याला क्रिकेटमधील मानाच्या गॅरी सोबर्स चषकाने सन्मानित करण्यात येणार आहे. 

वर्षभरात लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या खेळाडूचा आयसीसीकडून दरवर्षी सन्मान केला जातो. खेळाडूंच्या  सातत्यपूर्ण कामगिरीचा गौरव करण्यासाठी आयसीसीने निवडलेल्या एकदिवसीय संघात विराट कोहलीसह रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे. आयसीसीने एकदिवसीय संघाचे नेतृत्वी देखील कोहलीकडेच दिले आहे.

२१ सप्टेंबर २०१६ ते ३१ डिसेंबर २०१७  या कालावधीत विराट कोहलीने कसोटीत ७७.८० च्या सरासरीने २२०३ धावा केल्या असून, यात ८ शतके आणि ५ द्विशतकांचा समावेश आहे. याशिवाय एकदिवसीय क्रिकेटमध्येही त्याने चमकदार कामगिरी केली. याच कालावधीत एकदिवसीय सामन्यात कोहलीने ८८.६३ च्या सरासरी आणि ७ शतकांच्या मदतीने १८१८ धावा केल्या आहेत. टी-२० मध्ये त्याने २९९  केल्या आहेत.