बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 27 जानेवारी 2018 (16:01 IST)

आय पी एल लिलाव सुरु पहा कोणता खेळाडू कोणत्या टीममध्ये

आता आयपीएलच्या 11 व्या सिझन साठी खेळाडूंचा लिलाव प्रक्रिया सुरु आहे. आतापर्यंत ज्या खेळाडूंची विक्री झाली आहे ते कुठल्या संघाकडून खेळणार आहेत ते जाणून घ्या. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला बंपर लॉटरी लागली आहे. राजस्थान रॉयल्सने तब्बल 12.50 कोटी रुपयात बेन स्टोक्सची खरेदी केली आहे. मागील सत्रात बेन स्टोक्सवर १४ कोटी ५० लाख रुपये इतकी बोली लागली होती. यंदा ५७८ खेळाडू लिलावात सहभागी होत आहेत. त्यातील ३६१ भारतीय आहेत. भारत आणि जगातील अव्वल १६ खेळाडूंना एलिट दर्जा बहाल करण्यात आला असून, या खेळाडूंचे आधारमूल्य दोन कोटी इतके आहे. ऋद्धिमान साहाला हैदराबादने 5 कोटींना केलं खरेदी केले आहे. तर दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकला बंगळुरुने 2.8 कोटींना घेतलं विकत आहे. यामध्ये पार्थिव पटेलवर कोणीच बोली लावली नाही. मोईन अलीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 1 कोटी 70 लाखांना घेतलं विकत आहे. तर मार्कस स्टॉईनिसला किंग्ज इलेव्हन पंजाबने 6 कोटी 20 लाखांना घेतलं असून स्टुअर्ट बिन्नीला राजस्थान रॉयल्सने 50 लाखांना घेतलं विकत घेतल आहे. कॉलिन मुन्रोला दिल्ली डेअरडेव्हिल्सने 1 कोटी 90 लाखांना घेतलं विकत असून युसूफ पठाणला सनरायझर्स हैदराबादने 1 कोटी 90 लाखांना घेतलं विकत घेतले आहे. 

मुंबई इंडियन्स 
रोहित शर्मा ( भारतीय ) हार्दिक पांडया (भारतीय) जसप्रीत बुमराह (भारतीय) किरॉन पोलार्ड (वेस्ट इंडिज)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु 
विराट कोहली (भारतीय) एबी डि विलियर्स (दक्षिण आफ्रिका) ब्रँडन मॅक्क्युलम (न्यूझीलंड) ख्रिस वोक्स (इंग्लंड) कॉलनी डी ग्रँडहोनी (न्यूझीलंड) मोइन अली (इंग्लंड)

राजस्थान रॉयल्स 
स्टीव्हन स्मिथ (ऑस्ट्रेलिया) अजिंक्य रहाणे (भारतीय)  बेन स्टोक्स (इंग्लंड) स्टुअर्ट बिन्नी (भारतीय)

किंग्ज इलेव्हन पंजाब 
अक्षर पटेल (भारतीय) करुण नायर (भारतीय) आर.अश्विन (भारतीय) युवराज सिंह (भारतीय) केएल राहुल (भारतीय) डेव्हीड मिलर (दक्षिण आफ्रिका) अॅरोन फिंच (ऑस्ट्रेलिया)मारक्युस स्टॉईनीस (ऑस्ट्रेलिया)

कोलकाता नाईट रायडर्स
सुनील नरेन (वेस्ट इंडिज)अँड्रे रसेल (वेस्ट इंडिज) मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया) ख्रिस लिन (ऑस्ट्रेलिया)

दिल्ली डेअरेडेव्हिल्स 
ख्रिस मॉरीस (दक्षिण आफ्रिका) श्रेयस अय्यर (भारतीय) ऋषभ पंत (भारतीय)गौतम गंभीर (भारतीय) ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया) जेसन रॉय ( इंग्लंड)कॉलनी मुनरो (न्यूझीलंड)

सनरायजर्स हैदराबाद 
डेविड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया) भुवनेश्वर कुमार (भारतीय) कीब अल हसन (बांगलादेश) केन विलयमसन (न्यूझीलंड) शिखर धवन (भारतीय) मनीष पांडे (भारतीय)  कार्लोस ब्राथवेट (वेस्ट इंडिज) युसूफ पठाण (भारतीय)

चेन्नई सुपर किंग्ज 
एमएस धोनी (भारतीय) रविंद्र जाडेजा (भारतीय) सुरेश रैना (भारतीय) डवेन ब्रावो (वेस्ट इंडिज) फा डु प्लेसिस (दक्षिण आफ्रिका)शेन वॅटसन (ऑस्ट्रेलिया) केदार जाधव (भारतीय)