बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 23 जानेवारी 2018 (08:43 IST)

काश्मिरी मुलाचा क्रिकेट खेळतानाचा फोटो व्हायरल

जम्मू काश्मीर म्हटले की फक्त आतंकवादी पुढे येतात मात्र तेथे चांगले सुद्धा घडत असते. असाच प्रकार समोर आला आहे. यामध्ये  जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला पोलिसांनी नौहट्टा परिसरातील एक फोटो ट्विटरवर पोस्ट केला असून तो तुफान वायारल होतोय. फोटोमध्ये  काश्मीर खो-यात असलेला तणाव निवळू लागल्याचे संकेत दिसत असून  काश्मीर खो-यात कोणतीच समस्या नसून, सर्व काही शांतेतत सुरु असल्याचं सुदर चित्र तयार होते आहे.  जम्मू काश्मीर पोलिसातील काही अधिकारी एका काश्मिरी लाहान  मुलासोबत क्रिकेट खेळताना दिसत आहे. त्यात हि  विशेष असे की  यावेळी जवानाने स्टम्प म्हणून आपलं सुरक्षाकवच उभं केलं असून मुलगा फलंदाजी करत आहे. पोलीस जवान यावेळी स्टम्पच्या मागे विकेटकीपरच्या आहे. या  दोघांकडे बघितले तर कोणतीही चिंता नसून मुक्तपणे क्रिकेटचा आनंद घेत असून तसे दिसत आहे.  जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीदेखील हा फोटो रि ट्विट केला आहे. हा फोटो पत्रकार बासित जरगार यांनी काढला आहे.