1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
  4. ipl-11-indian-premier-league-to-begin-from-7th-april

आयपीएल ११ व्या मोसमाची घोषणा, सामन्यांच्या वेळेत बदल

आयपीएलच्या अकराव्या मोसमाची सुरुवात यावर्षी 7 एप्रिल रोजी मुंबईतून होईल, तर अंतिम सामना मुंबईतच 27 मे रोजी खेळवला जाईल. उद्घाटन सोहळा आणि अंतिम सामना मुंबईत होणार आहे. सोबतच  यावर्षी सामन्याच्या वेळेतही बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी दुपारी चार वाजता आणि रात्री आठ वाजता सामना सुरु व्हायचा, त्यात आता बदल करण्यात आला आहे. आठ वाजता सुरु होणाऱ्या सामन्यांचं थेट प्रक्षेपण आता सात वाजता सुरु होईल आणि दुपारी चार वाजता सुरु होणाऱ्या सामन्याचं प्रक्षेपण सायंकाळी साडे पाच वाजता होणार आहे.  
 
यंदाच्या आयपीएलसाठी 27 आणि 28 जानेवारी रोजी लिलाव होणार आहे, ज्यात 360 भारतीयांसह 378 खेळाडूंवर बोली लावली जाईल.
पुढील लेख
शिवसेनेची संघटनात्मक निवडणुक औपचारिकता, आदित्य नेते