रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 9 एप्रिल 2018 (17:17 IST)

अर्पिता खानची सलमानसाठी इमोशनल पोस्ट

बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे छोटी बहिण अर्पिता खान हिने इंस्टाग्राम अकाऊंटवर सलमान खानकरता एक इमोशनल पोस्ट केली आहे. यात अर्पिताने लिहिलं आहे की, माझी हिम्मत, माझी कमतरता, माझा गर्व, माझा आनंद, माझं आयुष्य, माझं जग, ईश्वराचा वरदा असलेल्या व्यक्तीला देवा तू आनंदात ठेव. तिने सलमानसाठी लिहिलेल्या या मॅसेजमध्ये देवाकडे सलमानसाठीची प्रार्थना आहे. 

अर्पिताच्या पोस्टला काहींचा दुजोरा तर काहींचा विरोध अर्पिता ही सलमान खानची लहान बहिण. सलमान खानसोबत जोधपुरमध्ये अर्पिता सतत त्याच्यासोबत होती. तिच्या या सपोर्टनंतर तिने सलमानसाठी ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टवर अनेकांनी सपोर्ट दर्शवला आहे तर काहींनी या पोस्टनंतर अर्पिताला ट्रोल केलं आहे.