गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 7 एप्रिल 2018 (11:47 IST)

सलमान आणि दीपिका ठरले सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रिटी

salman khan dipika padukon
दीपिका पदुकोण आणि सलमान खान हे 2017-2018 या आर्थिक वर्षाचे सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रिटी ठरले आहेत. स्कोर ट्रेड्स इंडियाने प्रसिद्ध केलेल्या या यादीत दीपिका पदुकोणने 2017-2018 ह्या आर्थिक वर्षात 14 आठवडे सर्वोच्च स्थानावर राहून बॉलीवूडची सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री असण्याचा मान मिळवला आहे. तसेच सुपरस्टार सलमान खानही 17 आठवडे सर्वाधिक लोकप्रिय राहून गेल्या आर्थिक वर्षातला नंबर वन लोकप्रिय अभिनेता झाला आहे.
 
अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया ह्या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे. त्यांच्या आकडेवारीनुसार, 2017-18 ह्या आर्थिक वर्षात दीपिका पदुकोण आपल्या पद्मावत चित्रपटामूळे सतत चर्चेत राहिली. तसेच, अभिनेता रणवीर सिंह सोबत असलेली तिची खास मैत्रीही तिला सोशल नेटवर्किंग साइट्स आणि मीडियामध्ये चर्चेत ठेवत होती. त्यामूळेच 58.22 गुणांसह 14 आठवडे सतत नंबर वन राहिलेली दीपिका गेल्या आर्थिक वर्षातली सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री ठरली आहे.
 
स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्ट्सवर 2017-2018 मध्ये सलमान खान, अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, शाहरुख खान आणि आमिर खान ह्या बॉलीवुड अभिनेत्यांसोबतच सोबतच दीपिका पदुकोण, प्रियंका चोप्रा, अनुष्का शर्मा, जॅकलिन फर्नांडिज आणि सोनम कपूर या बॉलीवुड अभिनेत्री टॉपवर राहिल्या.