मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

या सेलिब्रटींची मृत्यूही बाथरूममध्ये

प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवीची दुबईच्या बाथरूममध्ये मृत्यू झाल्याने दुनियेत याच प्रकारे मृत्यू पडलेल्या प्रसिद्ध व्यक्तींची आठवण करून दिली. भारतात ही बाब सामान्य नसली तरी दुनियेतील अनेक भागात नामवंत लोकांची बाथरूममध्ये झालेली गूढ मृत्यूचे प्रकरण काही आश्चर्यजनक नाही. हॉलिवूडच्या अनेक नामवंत लोकं, राजकारणी, कलाकार आणि अभिनेत्यांची मृत्यू या प्रकारे झालेली आहे.
 
अल्बर्ट डेकर: 5 मे 1968 रोजी प्रसिद्ध अभिनेता आणि अमेरिकन राजकारणी अल्बर्ट डेकर वयाच्या 63 वर्षी एक हॉटेलच्या बाथरूममध्ये गूढ परिस्थिती आढळले होते. अल्बर्ट पूर्णपणे नग्न अवस्थेत होते, त्यांचे दोन्ही हात बांधलेले आणि लाल लिपस्टिकने त्यांच्या पूर्ण शरीरावर अश्लील शब्द लिहिलेले होते. नंतर त्याची मृत्यू अपघात असल्याचे सांगितले गेले. ऑटोरेक्टिक एसिफिक्सेशनमुळे त्यांची मृत्यू झाल्याचे सांगितले गेले.
 
आल्फ्रेड लेनार्ड : आल्फ्रेड लेनार्ड श्नाइडर हे देखील हॉलिवूडचे प्रसिद्ध हास्य अभिनेता होते ज्याची वयाच्या 40 वर्षात मृत्यू झाली. ते हॉलिवूड हिल्स येथे आपल्या घरात राहायचे. ते प्रसिद्ध हास्य अभिनेता, लेखक, सामाजिक समीक्षक आणि व्यंग्यकार होते. 3 ऑगस्ट 1966 रोजी ते आपल्या घराच्या बाथरूम मध्ये मृत पडलेले होते.
 
एल्विस प्रेसली : किंग ऑफ पॉप आणि 20व्या शतकाचे चे महान संगीतकार एल्विस प्रेसली यांचे निधन मात्र 42 वर्षाच्या वयात झाले. महान अमेरिकी संगीतकारांमधनू एक असे प्रेसली मेम्फिस, टेनिसीच्या ग्रेसलँड मँशनच्या बाथरूममध्ये त्यांचे निधन झाले. ते दैनिक कार्य निवृत्तीसाठी बाथरूमला गेले होते. 16 ऑगस्ट 1977 साली बाथरूमच्या फर्शवर ते पडलेले सापडले.
 
जिम मॉरिसन : जिम मॉरिसन एक प्रसिद्ध अमेरिकी गायक आणि रॉक बँड द डोर्स चे लीड सिंगर आणि संस्थापक होते. पॅरिसच्या एका हॉटेलमध्ये त्याची मृत्यू झाली तेव्हा त्यांचे वय मात्र 28 वर्ष असे होते. त्यांचे निधन पॅरिसच्या एका अपार्टमेंटच्या बाथरूममध्ये झाले जेव्हाकि तेव्हा त्यांच्यासोबत त्यांची मैत्रीण पामेला कॉर्सन होती तरी त्यांची मृत्यू रहस्य आहे.
 
क्लॉड फ्रन्कोइस : क्लाड एक फ्रेंच पॉप सिंगर आणि गीत लेखक होते. मृत्यूवेळी ते 39 वर्षाचे होते. ते पाण्याने भरलेल्या बाथटबमध्ये उभे होते आणि बल्बहून पुरेसा उजड येत नसल्यामुळे ते उभ्या-उभ्या बल्ब ठीक करण्याचा प्रयत्न करत होते आणि करंट लागल्यामुळे बाथरूममध्ये पडले तर उठू शकले नाही. त्यांचे निधन 11 मार्च,1978 रोजी झाले.
 
ऑरव्हिले रेडेनबाकर : पॉपकॉर्न लवर्सला ऑरविल हे नाव नवे नसावे. हे एक अमेरिकी व्यवसायी होते ज्यांची कंपनी पॉपकॉर्न विक्रीसाठी ओळखली जात असे. 19 सप्टेंबर 1995 मध्ये त्यांची वयाच्या 88 वर्षी मृत्यू झाली. ते कॅलिफोर्नियाच्या कॉनरोडो स्थित आपल्या घरातील बाथरूममध्ये मृत सापडले. बाथटबमध्ये हार्ट अटॅकमुळे त्यांचे निधन झाले होते.
 
रॉबर्ट जोसेफ पास्टोरेली : पास्टोरेली एक अमेरिकी अभिनेते होते ज्यांनी सिनेमा, टीव्ही आणि रंगमंचावर अभिनय केले. 50 वर्षाचे रॉबर्ट बाथरूममध्ये मृत सापडले. त्यांच्या सहकार्‍याप्रमाणे ते बाथरूममध्ये हेरोइनचा नशा करायचे आणि ओव्हरडोजमुळे त्यांची मृत्यू झाली.
 
जूली गारलँड : जूली एक अमेरिकी अभिनेत्री आणि गायिका होती. यांचे 47 वर्षाच्या वयात निधन झाले. ड्रग्स घेण्याची सवय असल्यामुळे तिचे बाथरूममध्ये निधन झाले असे म्हणतात.
 
मायकल जैक्सन : अमेरिकी पॉप आइकन मायकल जैक्सनदेखील बाथरूममध्ये मृत सापडले होते. प्रोपोफोल नामक औषधाचे ओव्हरडोज घेतल्यामुळे ते बाथटबमधून उठू शकले नाही.
 
एमी व्हाइनहाऊस : या अभिनेत्रीचे 27 वर्षाच्या वयात निधन झाले. ड्रग आणि अल्कोहलच्या ऍडिक्शनमुळे यांची मृत्यू झाल्याचे सांगितलं जातं.
 
व्हिटनी हाउस्टन : प्रसिद्ध अमेरिकन गायिकेची मृत्यू एका हॉटेलच्या बाथरूममध्ये झाली होती. ड्रग्सच्या ओव्हरडोजमुळे निधन झाल्याची बातमी ऐकण्यात आली होती.
 
ब्रिटनी मर्फी : या अभिनेत्रीची शॉवरमध्ये मृत्यू झाली आणि त्यांच्या आईने शव बरामद केले होते. न्युमोनिया आणि इतर औषधांच्या सेवनामुळे त्यांची मृत्यू झाल्याचे सांगितले जाते.
 
हिथ लेजर : या ऑस्ट्रेलियन अभिनेत्याची मृत्यू सहा विभिन्न प्रकाराचे औषधं सोबत घेतल्यामुळे झाली होती. डॉक्टरांनी त्यांनी झोपेची, काळजी, डिप्रेशन, वेदना, सर्दी असे लक्षण बघता औषधं दिले होते परंतू यांच्या घातक कॉकटेलमुळे या ऑस्कर नामांकित अभिनेत्याची मृत्यू झाल्याचे सांगण्यात येतं.