सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

जगातील सर्वोत्तम लढाऊ विमान

एफ-22 रॅप्टर
लॉखिद मार्टीनचे हे विमान रडारांसाठी अदृश्य असतं. या सर्वाधिक आधुनिक, महाग आणि उन्नत लढाऊ विमानात अनेक सेंसर आणि अनेक तकनीक गुप्त ठेवण्यात आल्या आहेत. हे विमान M61A2 20 मिलिमीटर तोफ आणि 480 राऊंडसह सज्ज आहे.
 
एफ-35
लॉकहीड मार्टीनद्वारे तयार हे विमान एफ-22 हून जराच लहान असून त्यात एकच इंजिन आहे. हे गुपित चालसाठी प्रसिद्ध असून सोप्यारीत्या याला रडार पकडू शकत नाही. सुपरसॉनिक स्पीड आणि अत्याधुनिक यंत्रणेनं सज्ज हे विमान मिसाइलने लेस आणि बॉम्बं वर्षाव करण्यात सक्षम.
 
चेंगडू जे-20
चायनाचे हे विमान रशियाच्या मिग कंपनीच्या छोट्या आकाराची दोन इंजिन यात बसवण्यात आली आहे. मध्य आणि लांब अंतराच्या लढाऊ विमान जमिनी हल्लादेखील करू शकतो. यात एफ-22 विमानापेक्षा अधिक शस्त्र आणि इंधन ठेवण्याची क्षमता आहे.
 
एफ/ए- 18 इ/एफ सुपर हॉरनेट
सध्या सुपर हॉरनेट सर्वाधिक योग्य लढाऊ विमान आहे ज्यात दोन इंजिन आहेत. वेगवेगळ्या भूमिका निभावण्यासाठी सज्ज हे विमान मॅक 1.8 गती प्राप्त करू शकतं. बोईंग कंपनी निर्मित हे विमान ऑस्ट्रेलियात प्रमुख लढाऊ विमानाच्या रूपात सेवा देत आहे.
 
युरोफायटर टायफोन
हे विमान उन्नत युरोपीय मिसाइलने लेस अत्याधुनिक विमानांपैकी एक आहे. एफ-22 रॅप्टरच्या तुलनेत याची मारक क्षमता अधिक आहे. तसेच हे एफ-15, फ्रेंच रफाएल, सुखोई 27 सारख्या अनेक विमानांपेक्षा अधिक सक्षम आहे.
 
राफेल
फ्रान्सच्या दासो कंपनी निर्मित हे विमान तेथील वायू सेना आणि नौदला सेनाच्या सेवेत आहे. एकाच वेळी 40 ठिकाणांचा पत्ता लावणे आणि त्यातून चारवर एकाच वेळी वार करणे याची विशेषता आहे.
 
सुखोई 35
रशियाचे हे विमान वेगवान आणि चपळ आहे. याची रेंज लांब असून अधिक उंचीवर भरारी घेणे आणि वजनी शस्त्र सामावण्याची यात क्षमता आहे. याच्या 12 डॅनमध्ये 8000 किलो पर्यंत शस्त्र घेऊन जायची क्षमता आहे. याचे मोठे आणि शक्तिशाली इंजिन अधिक काळ उड्डाण भरण्यात मदतशीर ठरतात.
 
एफ-15 ईगल
एफ-15 ईगल 30 वर्षांपासून सेवेत आहे आणि आजही शत्रूंच्या रक्षा पंक्तीला तोडण्याच्या विमानांमध्ये अग्रगण्य मानले गेले आहे. याने 100 हून अधिक मारक हवाई हल्ले केले आहे आणि शीत युद्ध दरम्यानचे सर्वात यशस्वी लढाऊ विमान आहे. शत्रू क्षेत्रातील विमान शोधण्यात आणि त्यावर हल्ला करण्यात सक्षम आहे.
 
मिग-31
नाटोचे हवाई हल्ले आणि क्रूझ मिसाइलपासून बचावासाठी सोव्हिएत रूस ने हे विमान निर्मित केले होते. हे वेगवान असून उंच उड्डाण घेऊ शकतं. शत्रूचे जहाज हे लांबूनच आपल्या मिसाइलने ध्वस्त करून देतं. रशिया हवाई सुरक्षेत आजही या विमानाची जबाबदारी महत्त्वाची आहे.
 
एफ-16 फायटिंग फाल्कन
एफ 16 हे एफ-15 ईगल याचे हलके आणि कमी लागत असलेले संस्करण आहे. हे वार्‍यात व जमिनीवर वार करण्यात सक्षम आहे. लॉकहीड मार्टिनने मोठ्या संख्येत हे विमान निर्मित केले आहे आणि सध्या अमेरिकेसह 26 देशांच्या सेनेत हे सामील आहेत. हे विमान लहान, चपळ असून कॉकपिट पायलटला स्पष्ट दिसण्यात उपयुक्त आहेत.