1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

जीवन - एक गूढ प्रवास

‘आध्यात्म- शांती आणि सक्षमीकरणाचे एक साधन’ यावर उहापोह करण्यासाठी ५०० महिला नेत्यांचे संमेलन  
 
या ८ व्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत (IWC). ५०० कुशल, कलाकार, धोरणनिहाय, क्रीडापटू आणि इतर क्षेत्रातील यशस्वी महिला सहभागी होणार आहेत. ‘Life: A Mystical Journey,’(जीवन एक गूढ प्रवास) या शीर्षकाखाली 23 ते २५ फेब्रुवारी दरम्यान 'आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटर' बेंगलुरू येथे ही परिषद आयोजित करण्यात येत आहे.
 
(IWC)ची दोन विशेष ध्येय आहेत. वैयक्तिक vikas आणि एकत्रित करिती. यात जगभरातील महिला नेत्यांना, सहभाग वाढविण्याची आणि नेतृत्व विकास या संधी उपलब्ध होतील. 
 
या वर्षीच्या संमेलनातील काही वक्त्या... भारतीय स्टेट बँकच्या माजी चेअरमन, अरुंधती भट्टाचार्य; संस्थापक-अध्यक्ष मान देशी बँक, चेतना गाला सिन्हा; भारतीय अभिनेत्री,राणी मुखर्जी; पर्यावरणवादी आणि पर्यावरणशास्त्रज्ञ, वंदना शिवा ; अभिनेत्री, मधू शाह; गव्हर्नर, गोवा, मृदुलासिन्हा ; , सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ, एसएपी; आफ्रिकेतील नव उपक्रमांच्या प्रमुख,  अॅड्रिना मारायस; केलानिया विद्यापीठात सेंटर फॉर जेंडर स्टडीजच्या संस्थापक संचालक, प्रोफेसर मैथरी विक्रमासिंघे. 
 
(IWC)च्या अध्यक्षा, भानुमती नरसिंहन म्हणाल्या, “महिला या शांती प्रस्थापित करण्यात पुढे असतात. तणावमुक्त, हिंसामुक्त समाज निर्मितीसाठी त्या एकत्रितपणे काम करतात. ही परिषद म्हणजे शांती आणि एकता यांचा संदेश आहे.”
अनेक क्षेत्रांत स्त्रिया आघाडी घेत आहेत. IWC यासाठी प्रोत्साहन देते. ही परिषद महिला नेत्यांच प्रभाव वाढविण्यासाठी कार्य करते आणि सर्व पार्श्वभूमीतील महिलांच्या जागतिक विकासाला प्रोत्साहन देते.
 
2018 च्या परिषदेत आध्यात्मिक साधनांसह, शांतता आणि सशक्तीकरणाचे संदेश प्रभावी करण्याचे मार्ग शोधले जातील.
 
या परिषदेचे एक भागीदार असलेल्या आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते, श्री श्री रविशंकर म्हणतात, "समाजाच्या विकासात स्त्रियांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, समाज मजबूत आणि सामंजस्यपूर्ण आहे किंवा नाही हे त्यामुळेच ठरते." 
 
2005 मध्ये स्थापना झाल्यापासून, या परिषदेत विविधता आणि समावेशन यावर लक्ष केंद्रित केले आहे. या परिषदेत 375 पेक्षा जास्त प्रख्यात व 100 देशांमधील 5500 प्रतिनिधी सहभागी झाले होते. IWC नाजूक व संघर्षग्रस्त राज्यांमध्ये महिलांची स्थिती सुधारण्यावर लक्ष केंद्रित करते. तसेच जागतिक बॅंक इन्स्टीट्युटमध्ये काम करणाऱ्या महिलांना कमकुवत राष्ट्रातील महिलांसाठी सशक्तीकरण योजना विकसित करणे आणि इराकमधील विधवांचे व्यावसायिक प्रशिक्षण वाढविणे इत्यादी काम केले आहे.
 
ICW ने, आर्ट ऑफ लिव्हिंगच्या ‘गिफ्ट ए स्माईल’ प्रकल्पाला देखील समर्थन दिले आहे. 20 भारतीय राज्यांमधील 435 विनामूल्य शाळांमध्ये 58,000 पेक्षा जास्त विद्यार्थी अभ्यास करतात. मुलींमध्ये 48% तर 90% पहिल्या पिढीतील विद्यार्थी आहेत. मुलींच्या शिक्षणाचा प्रसार हे ICW साठी अधोरेखित क्षेत्र आहे.
 
यावर्षी भारतातील खुल्या पाणंदमुक्त जिल्हे तयार करण्यावर देखील लक्ष केंद्रित केले जाईल. पहिल्या टप्प्यात, संस्था शौचालयांचा वापर आणि आरोग्य व स्वच्छता या क्षेत्रांत संवेदनशीलता आणि जागरुकता निर्माण करेल.. दुसऱ्या टप्प्यात 4000 शौचालय बांधण्यात येतील.
 
यापूर्वी ICW ने सामाजिक प्रकल्प हाती घेतले आहेत. ज्यामध्ये दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी घरे, पर्यावरण आणि पर्यावरणाची काळजी घेण्याबद्दल जागरूकता निर्माण करणे, स्त्रियांविरोधात हिंसा रोखण्यासाठी चळवळ, आणि कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन मुलांचे व स्त्रियांचे सक्षमीकरण करणे यासारख्या योजनांचा समावेश आहे.