शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: गुरूवार, 8 फेब्रुवारी 2018 (12:54 IST)

ऑफिसमध्ये कमी प्रकाशात काम केल्याने तुमची स्मरणशक्ती कमी होऊ शकते

कमी प्रकाशात काम करत असाल तर याचा प्रभाव तुमच्या स्मरणशक्तीवर पडतो. एका नवीन स्टडीमध्ये या बातमीचा खुलासा झाला आहे.  
 
या स्टडीसाठी उंदिरांवर परीक्षण करण्यात आले. त्यांना कमी प्रकाश असणार्‍या खोलीत ठेवण्यात आले. स्टडीमध्ये असे आढळून आले की त्यांना योग्य ब्रेन कायम ठेवण्यासाठी ज्या रासायनिक पदार्थाची गरज असते ती कमी होत होती. चार आठवड्यानंतर मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी रिसर्चर्सने निष्कर्ष काढला की त्यांच्या स्मरणशक्तीत व शिकण्याच्या योग्यतेवर खराब प्रभाव पडत आहे.  
 
नवीन स्टडीचे लीड ऑथर जोल सोलर यांनी नाइल ग्रास उंदरांवर स्टडी केली. त्यांचे म्हणणे होते की डिम लाइटमध्ये काम केल्याने सुस्त होऊन जातो. त्यांनी सांगितले की नाइल ग्रास रेट्स मानव प्रमाणे असतात जे दिवसा जागतात आणि रात्री झोपतात. या उंदरांवर स्टडीसाठी दोन वेगळ्या प्रकाशाचा वापर करण्यात आला.  
 
मिशिगन युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांना आढळले की कमी प्रकाशात राहणार्‍या उंदिरामध्ये हिप्पोकॅम्पसमध्ये 30 टक्के कमतरता आली. हिप्पोकॅम्पस केंद्रीय मस्तिष्काचा तो भाग असतो जो स्मरणशक्ती, शिकायची क्षमता आणि इमोशंसला नियंत्रित करतो. याच उंदिरांना जेव्हा चार आठवड्यांसाठी योग्य प्रकाशात ठेवण्यात आले तर त्याची स्मरणशक्ती, शिकायच्या क्षमतेत सुधारणा आली.