शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

अबब! दीड कोटीचे नेलपॉलिश

आपली नखे सुंदर दिसावीत यासाठी महिला वर्ग विविध प्रकारचे नेलपॉलिश वापरतात. मग त्यात ड्रेसला नेलपॉलिश शोभून दिसेल असे कलर आवर्जून घेतले जातात. महागात महाग नेलपॉलिश किती रुपयांचे असेल असा प्रश्न कुणाला पडला असेल तर त्याचे उत्तर ऐकून थक्क होऊ शकाल. जगातील सर्वात महागड्या नेलपॉलिशच्या किमतीत चक्क एक एसयूव्ही खरेदी करता येईल.
 
लग्झरी ज्वेलरी डिझाईन करणारी अझेंचर कंपनी यासाठी प्रसिद्ध आहे. त्यांनी बनविलेल्या नेलपॉलिशची किंमत आहे 1 कोटी 58 लाख रुपये प्रती बाटली. या नेलपॉलिशची खासियत म्हणजे ते लावण्यासाठी सेवा कर भरावा लागतो. या नेलपॉलिशने एक नख रंगविण्यासाठी 1 लाख 90 हजार रुपये खर्च येतो.
 
या नेलपॉलिशमध्ये 267 कॅरेटचे काळे हिरे वापरले गेले आहेत. अर्थात हे नेलपॉलिश काही मोजक्या सेलेब्रिटीच खरेदी करु शकतील यात शंका नाही. याच कंपनीने 2013 साली 98 कॅरेट व्हाईट हिर्‍याचा वापर करुनही एक नेलपॉलिश तयार केले होते. ते सिंगर कॉरन ऑसबोर्नय टोनी ब्राक्सटन यांनी वापरल्याने त्या चर्चेत आल्या होत्या. त्यावेळी हे नेलपॉलिश लिलावात 10 लाख डॉलर्समध्ये विकले गेले होते.