भारत आज जगाचा मुकूटमणी बनला आहे. भारतीय बुद्धिमत्ता जगावर अधिराज्य गाजवते आहे. भारतीय तत्वज्ञान आणि अध्यात्मिकता यांचा मोह जगभरातील लोकांना पडला आहे. भारतीय उद्योगांनी जग पादाक्रांत करायची मोहीम सुरू केली आहे. सॉफ्टवेअरपासून व्यापारापर्यंत आणि खेळापासून अध्यात्मिकतेपर्यंत भारतीयांचे जगावरील प्रभूत्व आता सगळ्यांच्याच नजरेस येऊ लागले आहे. सव्वाशे वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या स्वामी...