बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

या देशातल्या महिला प्रेमापासून दूर राहतात

कामाच्या वाढत्या व्यापामुळे जवळपास 60 टक्के महिला प्रेमापासून दूर राहतात. हे आम्ही नाही म्हणत, एका सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.
 
ऑनलाइन डेटिंग वेबसाईट कोकोलोनी डॉट जेपीने हा सर्व्हे केला आहे. जपानमध्ये महिलांवर पुरुषांप्रमाणेच कामाचा ताण आहे. त्यामुळे काम संपल्यानंतर महिला डेटिंगला जाण्याऐवजी सोफ्यावर झोपून आराम करणं आणि टीव्ही पाहणं पसंत करतात, असं सर्व्हेत म्हटलं आहे.
 
ब्लाईंड डेट ताणतणाव वाढवतात सिन्हुआ या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार ऑफिसमध्ये प्रेमात पडण्याविषयीची आकर्षकता आता कमी झाली आहे. शिवाय ब्लाईंड डेटवर जाणं हे देखील महिलांसाठी कंटाळवाणं झालं असल्याचं सर्व्हेमधून समोर आलं आहे.

सर्व्हेनुसार, चार पैकी एका महिलेने हे स्वीकारलं की काम करताना थकल्यामुळे डेटिंगला गेलेलं असतानाच झोप लागली.
 
ऑनलाईन डेटिंग म्हणजे वेळेचा अपव्यय, यामुळे डेटवर न जाणार्‍या महिलांची संख्या वाढत आहे. कारण डेट करणं हा त्यांना वेळेचा अपव्यय वाटत असल्याचं ऑनलाईन डेटिंग साईट लव्हली मीडियाने म्हटलं आहे. काम, मातृत्व आणि पितृत्व यांमधून वेळ मिळाला तरच महिला प्रेमाच्या बाबतीत विचार करतात, असा निष्कर्ष या सर्वेक्षणातून निघाला आहे.