रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

जीवनात फक्त लाल-पांढराच

काही लोकांना विशिष्ट रंगाची आवड असते. मात्र असा रंग त्यांच्या डोक्यात असतो, डोक्यावर चढून बसलेला नसतो. बंगळूरमधील एका माणसाबाबत मात्र लाल आणि पांढरा रंग त्याच्या डोक्यावरच चढून बसलेला आहे. या माणसाच्या सर्व आयुष्याला या दोन रंगांनी पूर्णपणे व्यापलेले आहे. त्याच्या व त्याच्या कुटुंबीयांचया पोषाखापासून घर, घरातील पडदे, कटलरी, कार आणि अगदी गजराच्या घड्याळापर्यंत सर्व काही लाल-पांढर्‍या रंगाचेच आहे.
 
बंगळूरमधील रिअल इस्टेट एजंट सवनराज यांच्याबाबतीत लाल-पांढरा रंग हेच जीवन झाले आहे. त्यांचे सर्व खासगी आयुष्य याच दोन रंगांचे आहे. घरातील दुचाकी किंवा चारचाकी वाहन तसेच कपडेही याच दोन रंगांचे आहेत. घरातील संपूर्ण इंटिरिअरही याच दोन रंगाचे आहे. सोफ्यापासून भिंतीपर्यंत आणि पडद्यांपासून शोभेच्या वस्तूंपर्यंत सर्व केवळ हेच दोन रंग दिसून येतात.
 
आता त्यांच्या या विचित्र शौकाच्या तडाख्यातून केवळ टीव्हीच काय तो वाचलेला आहे. तो नेहमीच्या रंगात असून त्याच्या पडद्यावर विविध रंगांतीलच चित्रे दिसतात. अन्य कुणी व्यक्ती असती तर केवळ या दोनच रंगांमध्ये राहून तिच्या डोक्यावर विपरित परिणाम झाला असता. मात्र हे कुटुंब या दोन रंगांच्या दुनियेत खूश आहे. त्यांना या रंगांचा उबगही येत नाही हे विशेष.

फोनचा कव्हर, कफलिंक, अंगठी, ब्रेसलेट, हेडफोन अशा किरकोळ वस्तूही याच दोन रंगांतील आहेत. यावरुन त्यांची क्रेझ किती आहे हे आपण ओळखू शकतो. त्यामुळेच रेड अँड व्हाईट फॅमिली म्हणून ओळखले जाते.