मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

भारतीय उपनगरांत हवाई टॅक्सी

भारतातील मुंबईसह अनेक महानगरांत वाढत्या वाहनांमुळे वाहतूककोंडीची समस्या असून व्यावसायिक अधिकारी आणि उद्योगपतींना वाहतूककोंडीतूनही वेळेवर महत्त्वाच्या कामांसाठी जाता यावे यासाठी अमेरिकेच्या एका कंपनीने एअर टॅक्सी सेवा पुरवण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या एअर टॅक्सी म्हणजे निर्मनुष्य हवाई वाहने असून ती श्रीमंत व्यावसायकि व उद्योगपती वापरू शकतील.
 
व्हिमाना ग्लोबल इनकॉर्पोरेशन या कंपनीने या प्रस्तावावर काम सुरू केले असून दिल्ली, मुंबई, बंगळुरु व चेन्नई या महानगरांत ही सेवा सुरु करण्याचा त्यांचा विचार आहे. विमान ग्लोबल ही डेलावर येथील कंपनी असून त्याचे संस्थापक एवगेनी बोरीसोव यांनी सांगितले की भारतातील शहरांमध्ये एअर टॅक्सीचा पर्याय उत्तम आहे. इतरही काही देशांत त्यांचा वापर करता येईल. भारतात महानगरातील वाहतूककोंडीचा प्रश्न सोडवणे कठीण आहे.