गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2017
Written By
Last Modified: बुधवार, 5 एप्रिल 2017 (15:38 IST)

सट्टेबाजांचे भाकीत विराटचा संघ जिंकणार!

टी-20 आयपीएूच्या धरतीवर सट्टेबाजारात देखील वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळते. सट्टेबाजारातील अंदाजानुसार यंदा विराट कोहलीच्या रॉयल यॅलेंजर्स बंगळुरू संघाला विजेतेपदाचा दावेदार म्हणून पसंती दिली जात आहे. यापीएलमधील सट्टेबाजी आणि मॅच फिक्सिंग प्रकरण उघडकीस आल्यानंतर गेल्या काही वर्षात स्पर्धेच्या प्रशासकीय समितीकडून सट्टेबाजी रोखण्यासाठी विविध बदल देखील करण्यात आले. यंदाच्या पर्वाचा विजेता संघ म्हणून स्टेबाजांनी बंगळुरू संघाला पहिली पसंती दिली आहे. तर धोनीच्या पुणे सुपरजाएंट्स संघाला दुसरे स्थान देण्यात आले आहे. मुंबई इंडियन्स संघाला तिसरी तर गुजरात लायन्स संघाला चौथी पसंती दिली आहे. सट्टेबाजारात रॉयल चॅलेजर्स बंगळुरूचा दर प्रति शंभर रुपयांमागे 3.75 इतका लावण्यात आल आहे. याचा अर्थ रॉयल चॉलेंजर्स बंगळुरू संघ आयपीएलचा विजेता ठरला तर सट्टा लावणार्‍या व्यक्तीस 100 रुपयांच्या बदल्यात 375 रुपये मिळतील. तर रायझिंग पुणे सुपरस्टार संघाचा दर 6.10 इतका सुरू आहे. मुंबई इंडियन्स संघाचा दर 6.30 इतका आहे. दोनवेळा आयपीएलचे विजेतेपद भूषविलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाचा दर 8 रुपये इतका सुरू आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबला शेवटचे स्थान देण्यात आले आहे.