मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: शनिवार, 24 फेब्रुवारी 2018 (11:39 IST)

अरे बापरे! या ग्रहांवर चक्क पडतो हिर्‍यांचा पाऊस!

अंतराळात अशा काही गोष्टी घडतात, की त्याची उत्तरे शोधणे मानवी कल्पनेबाहेरचे आहे. आता आणखी एक बाब समोर आली आहे, की अंतराळात असेही काही ग्रह आहेत, ज्यावर चक्क हिर्‍यांचा पाऊस पडतो. 
 
एका रिपोर्टध्ये ही माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे काही शास्त्रज्ञांनी याला सिद्ध करण्याचादेखील प्रयत्न केल्याचे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. वैज्ञानिकांनी सांगितल्यानुसार, शनि आणि बुध या ग्रहांवर हिर्‍यांचा पाऊस पडतो. याशिवाय तेथे अनेक अशा गोष्टी घडतात, ज्याची आपण कल्पना करू शकत नाही. 
 
अ‍ॅस्ट्रोनोकिल सोसायटीच्या वार्षिक आढावा बैठकीत ही बाब समोर आली आहे. अमेरिकेतील वैज्ञानिकांच्या एका समूहाने हा दावा केला आहे. त्यांनी सांगितले की, या दोन्ही ग्रहांवर ढगांचा गडगडाट, विजा चमकणे आणि वादळाचे प्रमाण मोठे आहे. 
 
येथे होणारी बर्फवृष्टी मिथेन वायूचे रुपांतर कार्बनमध्ये करते. हा बर्फ पृष्ठभागावर पडताच त्याचे रुपांतर ग्रॅफाईटमध्ये होते. त्यानंतर त्याचे रुपांतर हिर्‍यात होते.