बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

सलमान अजुहानी तुरुंगात कालवीट शिकार भोवणार

सलमान खानला ५ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली असून तो जेलमध्ये आहे. शिक्षा सुनावताच त्यानंतर लगेचच त्याची रवानगी जोधपूर मध्यवर्ती कारागृहात केली होती. काल रात्र तुरूंगात काढल्यानंतर आज सुद्धा सलमानला तिथेच काढावी लागणार आहे. मात्र सलमानच्या शिक्षेवर अभिनेत्री प्रिती झिंटा सलमानला भेटायला चक्क जोधपूर जेलमध्ये पोहचली आहे. सलमानच्या दोन्ही बहिणी भावाला आधार देण्यासाठी जोधपूरमध्येच आली आहे. सलमान आणि प्रितीची मैत्री फार जुनी आहे. सलमानला भेटायला जाणारी प्रिती पहिली बॉलिवूड सेलिब्रेटी आहे. सलमान आणि प्रितीने हर दिल जो प्यार करेगा, चोरी चोरी चुपके चुपके, जानेमन, हिरोज अशा अनेक सिनेमात एकत्र काम केले आहे. सलमानला शिक्षा सुनावताच त्याच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी अनेक सेलिब्रेटींनी सलमानच्या निवास स्थानी हजेरी सुद्धा लावली आहे. कॉग्रेस नेते बाबा सिद्दीकी होते. तर अरबाजची एक्स वाईफ मलायका आणि तिची बहिण अमृता अरोरा, रेस ३ चे निर्माते रमेश तौरानी, अभिनेत्री स्नेहा उलाल, डेझी शहा यांनीही सलमाच्या कुटुंबियांची भेट घेतली.