1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 एप्रिल 2018 (10:07 IST)

सलमानची शिक्षा कमी व्हायला पाहिजे : जया बच्चन

jaya bachan
सलमान खानला पाच वर्षांची शिक्षा झाली हे ऐकून खूप वाईट वाटले. त्याने खूप समाजकार्य केले आहे. त्यामुळे त्याची शिक्षा कमी व्हायला पाहिजे, असे मत राज्यसभा खासदार जया बच्चन यांनी मांडले. यावेळी जया बच्चन यांनी म्हटले की, मला हे ऐकून वाईट वाटले. 20 वर्षांनी त्याला शिक्षा झाली, हे काहीसे अनाकलनीय आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेकजणांनी त्याच्यावर गुंतवणूक केली आहे. या निर्णयामुळे त्यांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे सलमान खानला दिलासा मिळायला हवा. त्याने बरेच समाजकार्य केले आहे, असे जया बच्चन यांनी सांगितले.