बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

रेस ३ सिनेमाचे पहिले गाणे प्रदर्शित

सलमान खान, जॅकलिन फर्नांडीज यांच्या  रेस ३ सिनेमाचे पहिले गाणे 'हिरिये' प्रदर्शित झाले. या गाण्यात सलमान आणि जॅकलिन एका डिस्को गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन रेमो डिसूजाने केले आहे. तर या गाण्याची कोरियोग्राफीही रेमो करत आहे. या गाण्याची खास गोष्ट म्हणजे यात जॅकलिनने पोल डान्स केला आहे.

रेस ३ च्या या गाण्याचे संगीत मीत ब्रदर्स यांनी केले असून गाणे पंजाबी सिंगर दीप मनी आणि नेहा भसीनने गायले आहे. दोन दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला रेस ३ च्या ट्रेलरने युट्युबवर पहिले स्थान बळकावले आहे.