कोवलम : आंतरराष्ट्रीय ख्यातीचा समुद्र किनारा
कोवलम एक दुसर्यां ना लागून तीन अर्धचंद्राकार समुद्र किनारे असलेला आंतरराष्ट्रीय ख्यातीचा समुद्र किनारा आहे. हे पर्यटकांचे, विशेषत: युरोपीय पर्यटकांचे 1930 पासूनच आवडते पर्यटन स्थळ आहे. इथे एका विशाल खडकाळ भूशिराने समुद्रात आंघोळ करण्यासाठी शांत पाण्याचे एक सुंदर खाडी निर्माण केली आहे.
ह्या समुद्र किनार्यापवर सुट्ट्यांचा आनंद लुटण्याचे अनेक पर्याय आहेत. धूपस्नान, पोहणे, वनस्पतींवर आधारित शरीराचे मालिश, विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आणि कॅटामारॅन क्रूझिंग हे त्यापैकी काही आहेत. उष्ण कटिबंधीय सूर्याचे ऊन एवढे भयंकर असते की तुम्ही काही मिनिटांतच तुमची त्वचा ताम्रवर्णाची झालेली तुम्हाला दिसेल. किनार्याीवरचे जीवन दुपार संपल्यावर सुरु होते आणि रात्री उशिरापर्यंत सुरु रहाते. बीच कॉम्प्लेक्समध्ये बजेट कॉटेज, आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट, संमेलन सुविधा, शॉपिंग झोन, स्विमिंग पूल्स, योग आणि आयुर्वेदिक मसाज केंद्र आहेत.
थिरुवनंतपुरम, केरळच्या राजधानीचे शहर, कोवलमपासून आवघ्या 16 किमीवर आहे आणि तेथे जाणे खूप सोपे आहे. पण जर तुम्ही सुट्टीवर असाल तर कोवलममध्ये राहून शहराला भेट देणे जास्त योग्य ठरेल.
थिरुवनंतपुरम शहरातली प्रेक्षणीय स्थळे आहेत- नेपियर म्युझियम, श्री चित्रा आर्ट गॅलरी, पद्मनाभस्वामी मंदीर, पोन्मुडि हिल स्टेशन इत्यादी. राज्य सरकारी हस्तकला एम्पोरियम (एसएमएसएम) इन्स्टिट्युट दुर्मिळ कलाकृती आणि अन्य वस्तूंच्या खरेदीसाठी योग्य ठिकाण आहे.
इथे येण्यासाठीचा सर्वोत्तम काळ: सप्टेंबर ते मार्च, खरेतर इथे वर्षभरात केव्हाही यायला हरकत नाही..
स्थान: थिरुवनंतपुरम शहरापासून फक्त 16 किमी, दक्षिण केरळ.
येथे पोहोचण्यासाठी:
जवळचे रेल्वे स्थानक: थिरुवनंतपुरम सेंट्रल, अंदाजे 16 किमी
जवळचा विमानतळ: थिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळ, अंदाजे 10 किमी.
साभार : केरळ टुरिझ्म