बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By

भारतातील अरण्याचे प्रकार

उष्ण कटिबंधातील सदाहरित अरण्ये - ही अरण्ये कायम हिरवी असतात. तापमान 25 ते 27 सें.ग्रेड आणि वर्षाला 250 सें.मी. पाऊस, भरपूर उष्णता आणि पावसामुळे वनस्पतींची जोमाने वाढ होते. वृक्ष आणि वेलींनी गुरफटल्यामुळे सूर्यकिरण जमिनीवर पोहोचू शकत नाहीत. एवोनी महागोनी, रोजवूड, रबर, बांबू इत्यादी वनस्पती पश्चिम घाटातील पश्चिमेकडील प्रदेश, अंदमान आणि निकोबार बेटे आणि ईशान्य  येकडील टेकडय़ा इत्यादी प्रदेशात आढळतात. 
 
उष्ण कटिबंधातील पानझडी वृक्षांची अरण्ये - या अरण्यांना मान्सून अरण्येही म्हणतात, सर्वसाधारण 75 सें.मी. ते 250 सें.मी. पावसाच्या   प्रदेशात ही अरण्ये आढळतात. यात आखुड बांबू, ताड, किकर, वेत, टिके, साल चंदन इत्यादी महत्त्वाचे वृक्ष आढळतात. कर्नाटकाचे जंगल चंदनासाठी प्रसिद्ध आहे. 
 
काटेरी झुडप्यांची अरण्ये - ज्या ठिकाणी 60 ते 75 सें.मी. पाऊस पडतो तेथे म्हणजे दक्षिण महाराष्ट्र, बळ्ळारी हा कर्नाटकातील प्रदेश, आंध्रातील कर्नूल आणि काडाप्पा इत्यादी प्रदेशात ही अरण्ये आढळतात. ज्या वनस्पतींची मुळे खोल गेलेली असून काटेरी असतात अशांची येथे वाढ होते. 
 
वाळवंटातील वनस्पती- जेथे वार्षिक पर्जन्यमान 10 सें.मी. पेक्षा कमी असते तेथे ही अरण्ये आढळतात. राजस्थानमधील थरचे वाळवंट, पंजाबची राजस्थानकडची बाजू, हरियाना आणि गुजरात येथे ही अरण्ये आहेत. या वनस्पतींची वैशिष्टय़े- पाने जाड आणि तकतकीत, काटेरी, बुटके खोड आणि खोलवर मुळे गेलेली असतात. यामध्ये बाभूळ, पाम, खजूर, बोर इत्यादी वनस्पती आढळतात.
 
मॅग्रोव्ह अरण्ये - यांना भरती-ओहोटीची अरण्ये म्हणतात. नद्यांच्या त्रिभुज प्रदेशात आणि नदीच्या मुखाजवळ लाटा येणार्‍या ठिकाणी आढळतात. यांना पारंब लोंबकळतात. गंगा, गोदावरी, महानदी आणि कृष्णेच्या त्रिभुज प्रदेशात ही अरण्ये आढळतात. याठिकाणी सुंदरीची झाडे असल्याने त्याला सुंदर बन म्हणतात. फर्निचर करण्यासाठी या लाकडांचा उपोग करतात. 
 
हिमालीन वनस्पती (अल्पाईन वनस्पती)- येथे वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आढळतात. हिमालयात 1500 मीटर उंचीपर्यंत सदाहरित अरण्ये आढळतात. काही ठिकाणी गवताळी प्रदेश आहे.
 
वेबदुनिया मराठी मोबाइल ऐप आता iTunes वर देखील, डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. एंड्रॉयड मोबाइल ऐप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. संपूर्ण साहित्य वाचण्यासाठी व तुमच्या सल्लासाठी आमच्या फेसबुक आणि ट्विटर पानावर फ़ॉलो करू शकता.