सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By

सूर्यमंदिर मोढेरा

लोक निसर्गाची पूजा करत असत. त्यामुळे सूर्याला प्राचीन काळापासून दैवत मानून त्याच्या मूर्तीची वा प्रतिमेची  पूजा केली जात असे.
 
भारतात अनेक सूर्यमंदिरे आहेत. भारतातील मोजक्या सूर्यमंदिरापैकी गुजरातधील 'मोढेरा येथील सूर्यमंदिर प्रसिद्ध आहे. हे सूर्यमंदिर मेहसाणापासून 25 कि.मी. तर पाटणच्या दक्षिणेस 30 कि.मी. अंतरावर आहे. हे मंदिर पुष्पावती नदीच्या काठावर आहे. या मंदिराचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या सूर्यमंदिराच्या गाभार्‍यातून कर्कवृत्त गेले आहे. कर्कवृत्तावर असलेल्या या मंदिराच्या तीन वास्तू आहेत. गर्भगृह, गाभारा,सभांडप आणि जलकुंड या तीन वास्तूंचे मिळून हे मंदिर बनले आहे. इ.स. 1026-27 या कालखंडात या भव्य सूर्यमंदिराची उभारणी राजा भीमदेव यांच्या काळात झाली. सोळंकी राजवटीत येथे पूजा अर्चा सुरू होती. नंतर मोहंमद गझनीने विध्वंस केल्यापासून आता येथे पूजा होत नाही. या सूर्यमंदिराची बाह्य आणि अंतर्गत रचना खूपच वैशिष्ट्यपूर्ण आणि खास आहे. 20 मार्च आणि 22 सप्टेंबर हे दोन दिवस सकाळचे पहिले सोनेरी किरण सूर्यदेवाच्या पायाशी पडतात. या संपूर्ण वास्तूच्या अंतर्गत भागात आणि बाह्य भिंतीवर आणि खांबावर अप्रति असे कोरीव काम आहे. सर्वत्र रामायण महाभारतातील प्रसंग, बारा आदित्य रूपे दिक्वापाल, अप्सरा अशी अत्यंत देखणी कोरीव शिल्पे आहेत.
 
येथील जलकुंडाची रचनाही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशीच आहे. संपूर्ण र्सूंदिर परिसर हा नजर खिळवून ठेवणारा असा आहे. असे म्हणतात की या सूर्यमंदिरात एक भुयार पाटण येथून 30 कि.मी. अंतरावर आहे. रानी की बारवला हे जाऊन मिळते. येथील विशाल जलकुंडाला 'सूर्यकुंड' असे म्हणतात. कोणार्कच्या सूर्यमंदिराची या मंदिराची तुलना नसली तरी हे सूर्यमंदिर देखणे आहे.
 
म. अ. खाडिलकर