शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गुजरातनो स्वाद
Written By

गुजराती स्पेशल : हंडवा

साहित्य : 2 वाटी तांदूळ, 1/2 वाटी चण्याची डाळ, 1/2 वाटी उडदाची डाळ, 1/4 वाटी तुरीची डाळ, 2 चमचे दही, 1 चमचा आलं, लसूण, मिरची पेस्ट, मीठ चवीनुसार, 1/4 चमचा हळद, 1 चमचा साखर, 1/2 चमचा धणे पूड, 1/2 चमचा सोडा. 
 
फोडणीचे साहित्य : 1 चमचा तीळ, 1/2 चमचा मोहरी, 1 चमचा तेल, कडी पत्ता, 4 लवंगा, कलमीचा तुकडा 1/2 इंच, 2 साबूत लाल मिरच्या. 
 
कृती : सर्वप्रथम तांदूळ व डाळींना 7-8 तासासाठी भिजत ठेवावे. नंतर त्यात दही घालून वाटून घ्यावे. 4-5 तास या मिश्रणाला खमीर येण्यासाठी तसेच ठेवावे. नंतर त्यात साखर, मीठ, सोडा, हळद व धणे पूड घालून 35 मिनिट बेक करावे. थंड झाल्यावर त्यांचे काप करावे. लवंग व कलमीला तव्यावर भाजून त्याची पूड करावी. गरम तेलात फोडणी देताना सर्व फोडणीचे साहित्य घालून फोडणी तयार करावी व काप केलेल्या तुकड्यांवर पसरवावी. चटणीसोबत सर्व्ह करावे.