लसूणी मुगाची डाळ
WD |
कृती - डाळ धुवून अर्धा तास भिजत ठेवा, डाळ मायक्रोवेव्ह सेफ बाऊलमध्ये टाका. त्यात शिजणेपुरते पाणी- मीठ- हळद-टाकून त्यावर झाकण ठेवून मायक्रोवेव्हमध्ये हायवर (१00%) १0 मिनिटे ठेवा. दुसर्या बाऊलमध्ये तेल, लसणाचे काप, कढीपत्त्याची पानं, जिरे, हिंग, लवंगा, लाल मिरची टाकून झाकण न ठेवता हायवर (१00%) ३0 सेकंद ठेवा. नंतर यात शिजलेली मुगाची डाळ टाकून मायक्रोवेव्हमध्ये हायवर झाकण न ठेवता २ मिनिटं ठेवा. बाहेर काढून त्यावर कोथिंबीर पेरा.
