सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By

रंगिले राजस्थान

निसर्गाचे रंगीबेरंगी रंग दाखविणार राजस्थानमध्ये एका शाही आदरातिथमधून अनोखे सेलिब्रेशन अनुभवाला येते. भव्य राजवाडे, कलात्मक हाल, प्राचीन मंदिरे, निसर्ग आणि मानवनिर्मित सरोवरे, ऐतिहासिक किल्ले असा राजस्थानचा समृद्ध वारसा, पर्यटनामध्ये  झळाळून निघतो. राजस्थानधील वातावरण आणि निसर्गसौंदर्यं अप्रतिम असते. या ठिकाणी पर्यटकांना हवेतील हॉटेल्स उपलब्ध आहेत. पारंपरिक लोकसंगीतापासून ते चविष्ट पाककलेपर्यंत अनेक बाबतीत बहुरंगी असलेले रंगीबेरंगी राजस्थान बघायला जगभरातील लाखो पर्यटक दरवर्षी येतात. त्यामुळे फेस्टिव्हल दरम्यानच्या सेलिब्रेशनला  फॅमिलीसोबत पर्यटक येत असतात.
 
एव्हरग्रीन केरळ -कोचीनच्या प्रसिद्ध सेंट फ्रान्सिस चर्चपासून चर्चला दिलेला रंग आणि केलेली सजावट हे सर्व छान असते. सुवासिक मसाल्यासाठी आणि जगात पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले केरळ अनोख्या सौंदर्याने सर्वाना भुरळ घालते. मनमोहक बीच, सदाबहार वनराई, हिरवेगार चहाचे माळे, उंचच उंच नारळाची झाडे आणि ताडाची झाडे, टुमदार घरे आणि आकर्षक, आलिशान हाऊसबोट अशा आल्हाददाक सौंदर्यांने केरळ अधिकच जवळचे वाटते. येथील प्राचीन मंदिरे, संग्रहालये, निसर्गसौंदर्य पाहतानाच केरळच्या संस्कृतीचा, परंपरेचा परिचयही होतो. कैराली शो, कुमीली स्पाइस व्हिलेजमध्ये शॉपिंग पुत्तुपट्टी डॅममधील स्पीड बोट राइड, अर्ध चंद्राकार आकाराचा कडेवालम बीच अशा एव्हरग्रीन केरळमध्ये पर्यटन ही एक आनंददायक आठवण राहते.
एक्सायटिंग अंदमान - भारतातच असलेले हे डेस्टिनेशन आपले वेगळेपण टिकवून आहे, क्रिस्टल क्लिअर बीचेस आणि निसर्ग वैविध्यामुळे इथे नेहमीच पर्यटक गर्दी करतात. इथे गेल्यावर थायलंड, मॉरिशस अशा देशात गेल्याचा भास होतो. येथील गगनचुंबी वृक्ष, समुद्रातील शंख-शिंपले आणि कोरल्स, अजस्र मासे, खळाळणारे निळे पाणी आणि या सर्वांना साक्षी असणारे निरभ्र आकाश, हा अनुभव काही औरच असतो.
 
म. अ. खाडिलकर