सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

शरीरात हे बदल दिसल्यास लगेच बदला आहार

आपलं आरोग्य आहारावर अवलंबून असतं. अनेकदा नकळत आहाराचा हिशोब चुकतो आणि शरीराला पूर्ण पोषण मिळत नाही. चुकीची डायट घेताना शरीर आपोआप संकेत देऊ लागतं पण अनेकदा आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो. परंतू हा दुर्लक्षपणा भविष्यात धोकादायक ठरू शकतो म्हणून जाणून घ्या शरीरात दिसत असलेले हे बदल:
 
श्वासात दुर्गंध
आपल्या श्वासात हलकी दुर्गंध आपल्या आहार गडबड असल्याचे संकेत देते. शरीराला पर्याप्त प्रमाणात ग्लूकोज मिळत नसल्यास साठलेल्या फॅट्सचे क्षय होत असून त्याने आम्ल तयार होतात आणि दुर्गंध येते. 
 
केस गळणे
केस अचानक अधिक गळू लागले असतील तर सर्वात आधी आपलं थायरॉईड तपासणी करवावी. इतर तपासणी करून पाहाव्या आणि त्यात रिर्पोट्स सामान्य असल्यास आपला आहार चुकीचा आहे जाणून घ्यावे. 
 
कोरडे ओठ
ओठ नेहमी कोरडे पडत राहणे किंवा कोपरे फाटणे शरीरात आयरनची कमी असल्याचे संकेत आहे. अशात आहारात पालक आणि हिरव्या भाज्या सामील कराव्या. या व्यतिरिक्त पाणी आणि ज्यूस भरपूर प्रमाणात सेवन करावे. 
 
त्वचा संबंधी समस्या
त्वचेवर निरंतर पिंपल्स होणे किंवा त्वचा रुक्ष दिसणे हे देखील चुकीच्या आहाराची लक्षणे आहेत. व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि फॅटी अॅसिडची कमीमुळे आपल्या अश्या समस्यांना समोरा जावं लागतं. 
 
नखं तुटणे 
शरीरात प्रोटीन आणि मॅग्नेशियमची कमी असल्यास नखं कमजोर होऊन तुटू लागतात. त्वचेवर हलके डाग किंवा नखांवर पांढरे डाग दिसल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. 
 
बद्धकोष्ठता
पोटाच्या खराबीमुळे अनेक लोकांना बद्धकोष्ठता टिकून राहते, चुकीचा आहार याचे प्रमुख कारण आहे. अशात संतुलित प्रमाणात आहार घेणे व पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे. सीझनल फळं आणि भाज्या आहारात सामील कराव्या. 
 
थकवा 
कामाचं ओझं सामान्य असलं तरी अधिक थकवा जाणवतो तर आहाराकडे लक्ष द्या. कामात मन लागत नसल्यास आहारात साखर आणि कार्बोहाइड्रेट सामील करावे.