शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

Try This : सामान्य हेल्थ टिप्स

अधिक उपवास केल्यास शारीरिक व्याधी उत्पन्न होतात. यामुळे गॅसेस, अल्सर, डोकेदुखी उद्भऊ शकते. याशिवाय रक्ताची कमी भरून निघते. 
 
आपल्या आवडीचे जेवन घ्या, मात्र चरबीयुक्त जेवनाचे सेवन कमी प्रमाणात करा. आपण दररोज दोन अंडी घेत असल्यास एक घ्या. 
 
आपल्या व्यंजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी टेनिस, क्रिकेट, फूटबॉल यासारखे खेळ खेळण्यास चांगला परिणाम जाणवतो. यामुळे चरबी कमी होते. 
 
आवळा चुर्ण व आवळ्याचे पदार्थ त्वचेतील शुष्कता कमी करतात.
 
आहार हेच औषध आहे, स्वस्थ जेवनानेच आरोग्य ठणठणीत होते, यासाठी पोषक आहार घ्यावा.  
 
आहारात कडधान्ये, पालेभाज्या, फळे भरपूर घ्या. गव्हाचा आटा वापरा, बटाटे सालीसकट खा, भरपूर द्रव्यपदार्थ घ्या. 
 
आहारात हिरव्या भाज्या, ब्रेड, तांदूळ, दूध, दही, मास, अंडी, मासळी, फळे यामुळे पदार्थाचे सेवन करा. यामुळे शरीरास लागणारे व्हिटॅमिन मिळते. 
 
एकमेकांचे कपडे वापरू नयेत. दुसर्‍यांचा कंगवा, टॉवेल व इतर वस्तू उपयोगात आणू नये. त्याने त्वचेच्या तक्रारी उद्भवतात.
 
एकाचवेळी खूप जेवनापेक्षा थोडे थोडे जेवावे ते पुर्ण पचते व आरोग्याला फायदेशीर असते. 
 
एखादा दिवस जेवनाऐवजी फक्त एक वाटी कोबी, मोड आलेली कडधान्ने, एक वाटी, ग्लासभर ताक, मुळा, गाजर, टमाटर, काकडी, कोणतेही एखादे फळ घ्यावे.
 
काकडी, कांदा, गाजर, मुळा, बीट, तोंडली यांचे सेवन जास्त करावे, यापासून क जीवनसत्व प्राप्त होते.