मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

शरीराचे हे भाग स्पर्श केल्याने होऊ शकतात आजार

आपण बघितले असेल की अनेक लोकं रिकामे असताना आपल्या शरीराच्या कुठल्या तरी भाग स्पर्श करत असतात. परंतू विनाकारण इकडे-तिकडे स्पर्श करत राहिल्याने आजार होऊ शकतात. उगाच शरीराचा स्पर्श आजाराला निमंत्रण देतं. तर जाणून घ्या ते सहा पार्ट्स ज्यांना उगाच स्पर्श केल्याने गंभीर आजार होऊ शकतात.
 
चेहरा
विनाकारण चेहर्‍याला हात लावणे पुरळ, मुरूम यांना निमंत्रण देतं. कारण दिवसभर आपण अनेक ठिकाणी हात लावत असतो आणि हात धुतल्याविना चेहर्‍यावर हात लावल्याने इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. 
 
डोळे 
डोळे खूप संवेदनशील असतात म्हणून सतर्क राहणे आवश्यक आहे. अनेक लोकं कित्येकदा डोळे चोळत असतात. असे करणे टाळावे कारण याने इन्फेक्शनचा धोका असतो. 
 
नाक 
नाक शरीराचा महत्त्वपूर्ण अंग असून अनेक लोकांना आपण काम नसताना नाकात बोट टाकताना पाहत असतो. नाकात बोट घालून नाक स्वच्छ करण्याची सवय मोडायला हवी. याने नोजल इन्फेक्शनचा धोका असतो. 
 
तोंड
अनेक लोकं उगाचच आपल्या तोंडात बोटं खुपसतात. हे आरोग्यासाठी खूपच धोकादायक आहे. आपले हात स्वच्छ असले तरी इतर काम करताना कितीतरी बॅक्टेरिया हाताला चिकटलेले असतात. तोंडात बोटं घातल्याने ते सरळ तोंडात जातात. 
 
कान 
अनेक लोकं उगाचच कानात बोटं टाकतं असतात. असे केल्याने हाताची घाण कानात जाते आणि इन्फेक्शनचा धोका वाढतो. अनेक लोकं कान स्वच्छ करण्यासाठी आगपेटीच्या काड्या किंवा मेटल क्लिप किंवा पिन वापरतात, असे मुळीच करू नये याने कानाचा इयर कैनाल डैमेज होऊ शकते.  
 
प्राइव्हेट पार्ट्स
दररोज प्राइव्हेट पार्ट्सच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते. तिथे हात लावणे आजाराला निमंत्रण देण्यासारखे आहे. कारण त्या पार्ट्समध्ये अधिक प्रमाणात बॅक्टेरिया असतात आणि कपड्यांवरूनही तिथे स्पर्श केल्याने इन्फेक्शनचा धोका असतो.