रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

वर्षा ऋतत डायरिया व अमिमियापासून मुक्तता

पावसाळत ठिकठिकाणी गढूळ पाणी साचल्याने वातावरण खराब होते व पावसाळतील गढूळ पाण्यामुळे  रोगांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो व व्यक्ती डायरिया व अमिबियासिस सारख्या रोगाची शिकार होते. वर्षा ऋतूत माश्या फार होतात. या माश्या जेव्हा पाण्यावर किंवा उघड्या खाद्यपदार्थांवर बसतात तेव्हा त्यांद्याद्वारे रोग निर्माण करणारे हे किटाणू त्या खाद्यपदार्थ किंवा पाण्याद्वारे व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे डायरिया होतो. याच दूषित अन्न किंवा पाण्याद्वारे एन्टामिबा-हिस्टोलिका नावाचा जीवाणू शरीरात प्रवेश करतो व अमिबियासिस या रोगाची सुरुवात होते.
 
डायरिया होतो तेव्हा वारंवार पातळ शौचास होते. कफासारखा पातळ पदार्थ शौचाद्वारे पडू लागतो. भूक लागत नाही. जिभेवर पांढर्‍या रंगाचा मळ जमा होतो.
 
अमिबियासिस या रोगात पोटात मुरडा येऊन वारंवार शौचास होऊ लागते. कामात उत्साह वाटत नाही. शौचास जाऊन आल्यावरही व्यक्तीला वाटतं की, पुन्हा शौचास लागली आहे. सुस्ती जाणवते. सोबतच डोकेदुखी व अरुची हा त्रासदेखील होतो. व्यक्तीच्या मलपरीक्षेत अमिबाची सिस्ट दिसून येते.
 
पावसाळ्यात तशीच पचनशक्ती कमकुवत असते. त्यामुळे खाल्लेले अन्न नीट पचत नाही. अपाचित आहार द्रव्यामुळे तत्त्व (विषारी पदार्थ) नष्ट करणे जेणेकरून अमिबाला शरीरात वाढ होण्याकरिता माध्यम मिळणार नाही.