गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: शनिवार, 14 जुलै 2018 (11:54 IST)

... तर महिलांना होऊ शकतो मधुमेह

आठवड्यात 45 तासांपेक्षा जास्त वेळपर्यंत का करणार्‍या नोकरदार महिलांनी सावध राहण्याची गरज आहे. कारण त्यामुळे  मधुमेहाचा धोका वाढू शकतो, असा दावा एका ताज्या अध्ययनातून करण्यात आला आहे. आठवड्यात 30 ते 40 तासांपर्यंत काम करणार्‍या महिलांमध्ये अशा प्रकारचा कोणताही धोका आढळून आला नाही. एका अंदाजानुसार, 2030पर्यंत जगातील मधुमेहग्रस्तांची संख्या 43.9 कोटींवर पोहोचेल. कॅनडातील टोरंटो विद्यापीठ आणि सेंट मायकल हॉस्पिटलच्या शास्त्रज्ञांनी 35 ते 74 वयोगटातील सुमारे 7 हजार नोकरदार महिलांवर 12 वर्षे हे अध्ययन केले. या महिलांची काम  करण्याच्या चार गटांमध्ये (15 ते 34, 35 ते 40, 41 ते 44 आणि 45 तासांच्या वर) विभागणी केली. याशिवाय नोकरीच्या ठिकाणी असलेले पाळीतील काम व बैठे काम करण्याचे तास आदींचाही विचार करण्यात आला. ज्या महिला 45 तासांपेक्षा जास्त काम करतात, त्यांना मधुमेहाचा धोका 63 टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचे या अध्ययनात दिसून आले. कमी काम करणार्‍या महिलांध्ये मात्र हा धोका कमी आढळून आला. अर्थात यात घरकामाचा समावेश करण्यात आला नव्हता, असेही शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले.