सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

डोळ्याच्या आरोग्याची काळजी कशी घ्याल

ज्या डोळ्यांमुळे आपण हे सुंदर जग पाहतो, त्या डोळ्यांची काळजी घेण्याबाबत मात्र आपण अनेकदा हलगर्जीपणा करतो. कॉम्प्युटर, मोबाइल किंवा टीव्हीस्क्रिनकडे पाहात राहिल्याने डोळ्यांना त्रास होतो. अशावेळेस डोळ्यांची काळजी घेणे आवश्यक आहे.
 
कॉम्प्युटर हाताळताना सतत कॉम्प्युटरच्या स्क्रिनकडे पाहणे टाळा. अधूनमधून पापण्यांची उघडझाप करणे आवश्यक आहे. दर 30 मिनिटाला 5 मिनिटांचा ब्रेक घ्या. सतत कॉम्प्युटरकडे पाहात राहू नका. काही सेंकद इतर लांबच्या वस्तूकडे पाहात जा.
 
डोळ्यांविषयीची समस्या
 
डोळे लाल होणे, डोळ्यांना सूज येणे, सतत पाणी येणे यासारख्या समस्या जर तुम्हाला भेडसावत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. यावर तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. 
 
डोकेदुखीचा त्रास होत असल्यास डोळे तपासा. मधुमेही, रक्तदाबाच्या रुग्णांनी वर्षातून एकदा डोळे तपासून घेणे गरजेचे आहे. 40 वर्षांहून अधिक वयोगटातील व्य्रतींनी आय प्रेशर तपासून घेणे गरजेचे आहे.
 
निरोगी डोळ्यांसाठी टीप्स
 
व्हिटामिन ए, ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड आणि व्हिटामिन सी यु्क्त पदार्थांचा आहारात समावेश करा. नियमित डोळ्यांचे चेकअप करावे. युवी रे पासून क्षण करणारे सनग्लास वापरावे.
 
संगीता कुलकर्णी