सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

शुगर आणि कोलेस्टरॉलला कंट्रोलमध्ये ठेवतो मश्रुम

मश्रुममध्ये बरेच महत्त्वपूर्ण खनिज आणि जीवनसत्त्व असतात. यात व्हिटॅमिन बी, डी, पोटॅशियम, कॉपर, आयरन आणि सेलेनियमची भरपूर मात्रा असते. त्याशिवाय मश्रुममध्ये कोलीन नावाचा एक खास पोषक तत्त्व असतो, जो स्नायूंमध्ये सक्रियता आणि स्मरणशक्ती कायम ठेवण्यासाठी फारच फायदेशीर असतो.  
 
1. मश्रुममध्ये एंटी-ऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात असते.  
2. मश्रुममध्ये उपस्थित तत्त्व रोग प्रतिरोधक क्षमतेला वाढवतात. याने सर्दी पडसं सारखे आजार वारंवार होत नाही. मश्रुममध्ये उपस्थित सेलेनियम इम्यून सिस्टमच्या रिस्पॉन्सला उत्तम बनवतो.  
3. मश्रुम विटामिन डी चा चांगला पर्याय आहे. हे व्हिटॅमिन हाडांच्या मजबुतीसाठी फारच गरजेचे आहे. मश्रुमाचे सेवन नियमित केले तर आमच्या  आवश्यकतेचे 20 टक्के व्हिटॅमिन डी आम्हाला मिळून जात.  
4. मश्रुममध्ये फारच कमी मात्रेत कार्बोहाइड्रेट्स असतात, ज्याने वजन आणि ब्लड शुगर लेवल वाढत नाही.  
5. मश्रुममध्ये फारच कमी मात्रेत कोलेस्टरॉल असल्यामुळे याचे सेवन केल्याने बर्‍याच वेळेपर्यंत भूक लागत नाही.  
त्या शिवाय मश्रुम केसांसाठी आणि त्वचेसाठी देखील फार फायदेशीर आहे. काही स्टडीत असे आढळून आले आहे की मश्रुमच्या सेवनामुळे कँसर होण्याची आशंका कमी असते.