बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

फास्टफूड एका प्रकारे व्यसन, सिगारेट-अल्कोहोल जितकेच घातक

सिगारेट किंवा अल्कोहोलचे व्यसन असलेल्या लोकांना याचे सेवन सोडल्यावर ज्या प्रकारे समस्यांना सामोरा जावं लागतं त्या प्रकारे पिझ्झा, बर्गर न खाल्ल्याने फास्टफूड प्रेमींना त्याचा त्रास जाणवतो. कारण फास्टफूडचे व्यसन सिगारेट-अल्कोहोल जितकेच वाईट आहे. 
 
एक संशोधनानुसार फास्ट फूड न खाल्ल्याने किमान एक आठवडा तरी तसेच लक्षात दिसून येतात जसे अल्कोहोल आणि सिगारेट ओढणे सोडल्यावर जाणवतात. मनुष्याला डोकेदुखी, अस्वस्थता, चिडचिडपणा, नैराश्य, सुस्ती आणि सतत फास्टफूड खाण्याची इच्छा होते.
 
यूएसमध्ये 19 ते 68 वयोगटातील लोकांवर हा अभ्यास केला गेला. संशोधकांनी सर्व सहभागींना सतत एक महिन्यासाठी फास्टफूड टाळण्यासाठी किंवा सेवन कमी करण्याचे निर्देश दिले. या दरम्यान, 98 टक्के सहभागींनी डोकेदुखी, अस्वस्थता, चिडचिडपणा, नैराश्य, सुस्ती आणि सतत फास्टफूड खायची इच्छा होणे स्वीकारले. या भावना दुसर्‍या ते पाचव्या दिवसांमध्ये सर्वात शक्तिशाली होत्या. तथापि, सातव्या दिवसापासून याचे प्रकार कमी होऊ लागले. यावरून संशोधकांनी अंदाज बांधला की फास्टफूड देखील एक प्रकाराचे व्यसन आहे. त्यावर नियंत्रण करणे आवश्यक आहे नाहीतर हे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं.