शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 जानेवारी 2019 (00:57 IST)

फळांपासून कोण कोणते जीवनसत्व मिळतात जाणून घ्या...

फळे आपल्या आरोग्याची तसेच आपल्या सौंदर्याची काळजी घेत असतात. दररोजच्या आहारात फळाचा समावेश असल्यास बर्‍यापैकी आपण आजारावर नियंत्रण मिळवू शकतो. त्यामुळे कुठल्या फळापासून आपल्याला कुठले जीवनसत्व मिळत असते हे आपल्या माहीत असणे आवश्यक असते.
  

केळी :
 केळीत ग्लुकोज, सूक्रोज आणि फ्रुक्टोज असे तीन प्रकारचे नै‍सर्गिक गुण असतात. यालाच इन्स्टंट एनर्जी बूस्टर म्हणतात. केळी दररोज खाल्ल्यास बरेचसे आजार दूर होतात. 
द्राक्ष - द्राक्षामध्ये अँटी ऑक्सिडेंट मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे आपल्या शरीरातील रक्तवाहिन्यांना संसर्ग होत नाही. सुक्ष्म जीवापासून त्या आपले सरंक्षण करत असतात.