कुसुमाग्रज यांच्या दोन सुंदर कविता
1
एकाकी..
एक बाकी एकाकी,
एक अंत एकांत..
एक अडके एकात,
एक एकटया जगात..
एक खिडकी एक वारा,
एक चंद्र एक तारा..
एक नजर एक वाट, एक एकटा.....एकटाच...!!!!
2
चालणारे दोन पाय किती विसंगत,
एक मागे असते, एक पुढे असते ,
पुढच्याला अभिमान नसतो,
मागच्याचा अपमान नसतो,
कारण त्यांना माहित असत,
क्षनात हे बदलणार असत,
याचच नाव जीवन असत....!!!!