1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

'रेस-३' च्या फोटोला तासाभरात ३ लाखांहून अधिक लाईक्स

Bollywood news
अभिनेता सलमान खान सध्‍या 'रेस-३'च्‍या प्रमोशनमध्‍ये बिझी आहे. यात तो  सोशल मीडियावरदेखील प्रमोशन  करत आहे. सलमानने गुरुवारी जॅकलीनचा एक सुंदर फोटो इन्‍स्‍टाग्राम शेअर केलाय. हा फोटो पाहून सलमानचे चाहत्‍यांनी प्रतिक्रिया देण्‍यास सुरूवात केलीय. सलमानने पोस्ट केलेल्‍या फोटोत जॅकलीनने लाल रंगाची साडी नेसली आहे. सलमानने फोटो कॅप्‍शनमध्‍ये लिहिलयं की, 'जॅकलीन किती क्‍यूट दिसत आहे.' 
 
या फोटोला तासाभरात ३ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. जॅकलीनचा हा लुक 'रेस-३' च्‍या रोमँटिक सॉन्गमधलं आहे. ज्‍यामध्‍ये ती सलमानसोबत रोमान्‍स करताना दिसणार आहे. परंतु, हा फोटो पाहिल्‍यानंतर सलमानच्‍या चाहत्‍यांनी कॉमेंट्‍स दिल्‍या. एका युजरने लिहिलय की, 'सलमान तुमको प्यार हो गया हैं, भाई फिर से प्यार हो गया फिर से धोखा'... तर काही युजर्सनी 'रेस-३' मधील चर्चित डायलॉग लिहिले. तर आणखी एका युजरने 'आर बिजनेस इज आर बिजनेस...' अशी कॉमेंट दिली आहे.