बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 मे 2018 (17:24 IST)

रेस ३ चे सेल्फिश गाणे लवकरच, जॅकलीनचा लूकची चर्चा

रेस-३' या चित्रपटातील ‘हीरिए’ या गाण्‍याने सोशल मीडियावर तुफान गाजते आहे. आता त्या पाठोपाठ अजून एक गाणे रिलीज झाले आहे. यात ‘सेल्फिश’ गाण्यात जॅकलिन फर्नांडिस असून तिच्या लूकचीही बरीच चर्चा  चहेते करत आहेत. यामध्ये अभिनेता सलमानने नुकतेच ट्विटद्वारे गाण्याबाबत माहिती दिली आहे. त्याने ‘सेल्फिश’मधील जॅकलीनचा लूक शेअर करून म्हटले होते ‘हाऊ स्वीट इज शी लुकिंग’. गाणे आतिफ अस्लम आणि लूलिया वंतूरने गायिले असून बॉलिवूडमध्‍ये लूलियाचे हे पहिले गाणे असणार  आहे. गाणे बॉबी देओल, सलमान खान आणि जॅकलीनवर चित्रित केलेले आहे. 

‘हीरिए’ गाणे यू ट्यूब येताच दोनच दिवसांमध्ये जवळपास ९ लाखांपेक्षाही अधिक वेळा पाहण्यात आलेअसून,  त्यामधील सलमान आणि जॅकलिनचे नृत्यही अनेकांना आवडले. आता ‘सेल्फिश’ गाणे लोकांना किती पसंत पडते याची उत्सुकता आहे. रेमो डीसोजा दिग्‍दर्शित हा चित्रपट १५ जूनला रिलीज होणार आहे.