बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

असा आहे काजोल-अजय देवगनचा मजेदार अंदाज

बॉलिवूड अभिनेत्री काजोल-अजय देवगन या जोडीचा मजेदार अंदाजाची झलक सोशल मीडियावरही दिसून येते. काजोल आपल्या मुलीसह सिंगापूर येथील तिच्या वॅक्स स्टॅच्यूच्या उद्घाटनासाठी गेली होती. त्या दरम्यानचा एक व्हिडिओ शेअर करत अजय देवगनने सोशल मीडियावर काजोलची खिल्ली उडवली. 
 
अजय देवगनने आपली मुलगी न्यासा आणि पत्नी काजोलचा वॅक्स स्टॅच्यूसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ शेअर करताना अजयने लिहिले की, भेटा शांत काजोलला... अजयच्या या खिल्लीवर काजोलनेही मजेशीर उत्तर दिले. मुझे घर आने दो... अशी कमेंट करत काजोलने पत्नीगिरी दाखवली.