मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 18 जानेवारी 2018 (15:25 IST)

अजयने असं काय केलंय ज्यामुळे काजोल आता खूश झाली?

बॉलिवूड अभिनेत्यांधील चेन सेकर्सपैकी एक असलेल्या अजय देवगणने च सिगारेट ओढणे बंद केले आहे. अजयने गेल्या 50 दिवसांत एकही सिगारेट ओढली नसून पुन्हा या व्यसनाच्या आहारी न जाण्यासाठी तो पूर्ण प्रयत्न करत आहे. अजयच्या या निर्णयामुळे त्याची पत्नी काजोल खूप खूश झाली आहे. अजय हा चेन सेकर होता. काजोल काय त्याच्या या सिगारेटच्या सवयीचा विरोध करायची. गेल्या वर्षी सतत सिगारेट प्यायल्याने अजय आजारी पडला होता. त्यानंतर अजयने सिगारेट ओढण्याची सवय कमी केली होती. हळूहळू करत अजयने नोव्हेंबर महिन्यापासून पूर्णपणे सिगारेट ओढणे थांबविले आहे. रेड या त्याच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अचानक सिगारेट सोडायचा विचार अजयच्या मनात आला आणि एके दिवशी त्याने अचानक सिगारेट सोडल्याचे जाहीर केले. तेव्हापासून अजयने सिगारेटला हातही लावलेला नाही, असे बॉम्बे टाईम्सने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी काजोलने एका मुलाखतीत अजयने सिगारेट सोडावी अशी इच्छा व्यक्त केली होती. माझे आणि अजयचे त्याच्या सिगारेट ओढण्याच्या सवयीवरून भांडण होत असते. त्याची ही सवय मला अजिबात आवडत नाही. त्याने लवकरात लवकर सिगारेट सोडावी अशी माझी इच्छा आहे.