1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 जानेवारी 2018 (11:54 IST)

सुपरहिरो पुन्हा अवतरणार

hritik roshan super hero
हृतिक रोशन याने साकारलेला हिंदुस्थानचा पहिला सुपरहिरो 'क्रिश'ने बच्चे कंपनीला वेड लावले होते. क्रिश चित्रपट तर सुपरहिट झालाच पण सुपरहिरो म्हणून हृतिकदेखील लोकांना प्रचंड आवडला होता. त्यामुळेच आता या चित्रपटाचे निर्माते व हृतिक रोशनचे वडील राकेश रोशन यांनी क्रिश सिरिजचा चौथाभाग तयार करणार असल्याचे जाहीर केले आहे. हृतिक रोशनने त्याचा 44 वा वाढदिवशी साजरा केला. त्यानिमित्ताने राकेश रोशन यांनी ट्विटवरवरून क्रिशच्या चौथ्या भागाची घोषणा केली. क्रिशच्या चौथ्या भागाची औपचारिकरीत्या घोषणा करण्यासाठी हा दिवस योग्य आहे. ख्रिसमस 2020 ला चित्रपट प्रदर्शित होईल. हृतिकच्या चाहत्यांना त्याच्या वाढदिवसानिमित्त    त्याच्याकडून ही भेटच आहे, असे राकेश यांनी ट्विट केले आहे. राकेश रोशन निर्मित  क्रिश या चित्रपटाच्या सिरिजची सुरुवात 'कोई मिल गया' या चित्रपटापासून झाली. त्यात हृतिकसोबत प्रीती झिंटा मुख्य भूमिकेत होती. कोई मिल गया हा चित्रपट क्रिशचा प्रिक्वेल होता. त्यानंतर आलेल्या क्रिश चित्रपटात हृतिकसोबत प्रियंका चोप्रा दिसली. तर त्यानंतरच्या क्रिश 2 या चित्रपटात हृतिकसोबत प्रियंका चोप्रा आणि कंगना राणावतने काम केले आहे. याच चित्रपटाच्या सेटवर कंगना व हृतिकचे अफेअर सुरू झाल्याचा दावा कंगनाने केला होता.