सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 9 जानेवारी 2018 (11:13 IST)

पद्मावती : पद्मावत २५ जानेवारीला चित्रपट गृहात

वादात अडकलेला पद्मावती चित्रपट नाव बदलून पद्मावत झाला आहे. आता हा चित्रपट  'पद्मावती' चित्रपटाच्या नावामध्ये आणि सिनेमामध्ये काही बदल केल्यानंतर आता हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यात  २५ जानेवारी रोजी हा चित्रपट गृहात दिसणार आहे. पद्मावत मध्ये रणवीर सिंह, शाहीद कपूर आणि दीपिका पदूकोण असून चित्रपट  २५ जानेवारीला रिलीज होणार असल्याची माहिती काही वेळापूर्वी प्रसिद्ध करण्यात  आली आहे. मात्र या चित्रपटला  २५ जानेवारी रोजी अक्षय कुमारचा 'पॅडमॅन' चित्रपट फाईट देणार आहेत. अय्यारी या चित्रपटाच्या रिलीज डेटमध्ये आता बदल करण्यात आले असून  २६ जानेवारी रोजी रिलीज होणारा 'अय्यारी' आता ९ फेब्रुवारी रोजी रिलीज होणार. त्यामुळे आता नाव बदलून पद्मावत प्रेक्षक खेचतो की अक्षय कुमार याचा सामाजिक विषयवार असलेला चित्रपट बाजी मारतो हे बघावे लागणार आहे.