मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 जानेवारी 2018 (08:22 IST)

'पॅडमॅन' चे दुसरे गाणे प्रदर्शित

अक्षय कुमारच्या पॅडमॅन चित्रपटाचे दुसरे गाणे प्रदर्शित झाले. 'हूबहू है तुमसा दिल ये...' असे या गाण्याचे बोल आहेत. त्याचबरोबर गाण्याच्या दरम्यान त्याचे काही डायलॉग्स देखील आहेत. गाणे पूर्णपणे अक्षय कुमार चित्रीत केलेले आहे. गाण्यात अक्षयचा सामान्य व्यक्ती ते पॅडमॅन बनण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. त्याचबरोबर सोनम कपूरशी झालेली मैत्री देखील दाखवण्यात आली आहे. तसंच दोघंही शाळेत सॅनिटरी नॅपकिन्स वाटताना दिसत आहेत.या चित्रपटाची निर्मिती ट्विंकल खन्ना तर दिग्दर्शन बाल्कीने केले आहे.