शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 डिसेंबर 2017 (16:32 IST)

अभिनेत्री स्नेहा उलाल पुन्हा एकदा बॉलीवूड डेब्यू

अभिनेत्री स्नेहा उलाल पुन्हा एकदा बॉलीवूड डेब्यू करत आहे. याआधी सलमानच्या 'लकी : नो टाईम फॉर लव' या सिनेमातून बॉलीवूड डेब्यू केले होते.  स्नेहाने नुकताच कैज खानसोबत 'इश्क वाली बारीश' गाणे केले आहे. यामध्ये तिच्या मोहक अदा चाहत्यांना पाहायला मिळणार आहेत. हे गाणे युट्यूबवर चांगलेच चर्चेत आहे. साधारण १.२ लाख लोकांनी हे गाणे आतापर्यंत पाहिले आहे. स्नेहाने यामागच्या यशाच सार क्रेडिट फॅन्सना दिलं आहे. हे गाणे सर्वांच्या पसंतीस पडेल याची मला आशा होती. 

स्पर्धा कधी संपत नाही, आपल्याला नेहमी प्रयत्न करावे लागतात,आमच्यासाठी प्रत्येक दिवस नवा असतो असे यावेळी स्नेहाने सांगितले. अल्ताफ सय्यदने हे गाणे कम्पोज केले आहे.