1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 10 जानेवारी 2018 (16:07 IST)

यंदाही सुझानकडून हृतिकला बर्थ डे च्या शुभेच्छा

birthday gift for hritik
यंदाही  बॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशनला बर्थ डे निमित्त त्याची घटस्फोटीत पत्नी सुझान खानने शुभेच्छा दिल्या आहेत. सुझानने इंस्टाग्रामवर एक खास फोटो शेअर करुन, बर्थ डे विश केलं आहे. “माझ्या आयुष्यात तू नेहमीच सूर्यकिरणांसारखा राहशील. नेहमी आनंदी राहा आणि तुझं तेज पसरत राहो” असं सुझानने म्हटलं आहे. सुझानने शेअर केलेल्या या फोटोला चाहत्यांनी लाईक केलं आहे.

हृतिक आणि सुझान यांनी 2014 मध्ये आपल्या 14 वर्षांच्या संसाराचा काडीमोड घेतला होता. हृतिकने त्याचा पहिला सिनेमा ‘कहो ना प्यार है’च्या यशानंतर वर्ष 2000 मध्ये सुझानसोबत लगीनगाठ बांधली होती. मात्र नंतर परस्परातील मतभेदांमुळे त्यांनी घटस्फोट घेतला. या दोघांना दोन मुलं आहेत. त्यांचा मोठा मुलगा रेहान 11 वर्षांचा तर लहान मुलगा रिदान 9 वर्षांचा आहे.